Ad will apear here
Next
पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट


औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नवनियुक्त अभ्यास मंडळ सदस्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला आठ ऑगस्ट रोजी भेट दिली.

या प्रसंगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे डॉ. तानाजी गीते (राजगुरुनगर), श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजचे डॉ. अरविंद शेलार (कर्वेनगर), जिजामाता महाविद्यालय भेंडा कॉलेजचे डॉ. संभाजी काळे (नेवासा), पंचवटी कॉलेजच्या डॉ. आशा पाटील (नाशिक) अण्णासाहेब मगर कॉलेजच्या डॉ. मेघना भोसले (हडपसर), सर परशुराम महाविद्यालयाचे डॉ. डी. बी. पवार (पुणे), एस. एम. जोशी कॉलेजच्या डॉ. वैशाली पाटील (हडपसर.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे (औंध, पुणे)  या सदस्यांनी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या वेळी विद्यार्थ्यांसोबत अर्थशास्त्र विषयातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात अर्थशास्त्र विषयाच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, अर्थशास्त्र विषयातील नोकरीच्या संधी, अर्थशास्त्राच्या व्यवसायभिमुख अभ्यासक्रम यांबाबत चर्चा करण्यात आली.

यानंतर प्राचार्य डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘पुणे विद्यापीठातील  अभ्यास मंडळावरील सदस्यांनी एकत्रीतपणे  महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचनेनुसार अभ्यास मंडळावरील सदस्य व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम तयार करतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रायव्हेट आणि कार्पोरेट सेक्टरमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतील.’

या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सदस्यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आयक्यूएसी कमिटीच्या चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी केले. आभार डॉ. तानाजी हातेकर यांनी आभार मानले केले. या कार्यक्रमासाठी प्रा. नलिनी पाचरणे, डॉ. शशी कराळे, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. किरण कुंभार डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTBBR
Similar Posts
‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ औंध : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येत होते; मात्र त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. अशा वेळेस डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे उपस्थित होते.
औंध येथे तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिर औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
औंध येथे उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दहा दिवसांची उद्योजकता विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language